जळगांव, दि. 1 :- जळगांव, भुसावळ,
यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील कापुस, व सोयाबीन हे पिक मोठया
प्रमाणात घेतले जाते शासनाने या पिकांचे सर्वेक्षण करणेसाठी तालुकास्तरावर किड
सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक करण्यांत आली आहे. सध्यास्थितीत कापूस व
सोयाबीन पिकावर खालीलप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग
नियंत्रणासाठी कृषि विषयक सल्ला पुढीलप्रमाणे
कापूस -तुडतुडयांच्या
प्रादुर्भावाबाबत पिकांची व्यवस्थित पाहणी करुन निरीक्षणे घ्यावीत झाडाच्या
खालच्या भागातील काही पानांचा चुरडामुरडा झाल्यास व पानांच्या कडा पिवळया झाल्यास
खालीलप्रमाणे फवारणी करावी प्रतिझाड प्रति तिन पानांवर 10 पांढरी माशींचा किंवा
फुलकिडींचा प्रादुर्भाव असल्यास रासायनिक किटक नाशकांची फावारणी करावी
व्हर्टीसिलीयम लुकॅनी – 4 ग्रॅम / लिटर पाणी किंवा 1 ग्राम धुण्याची पावडर / 1 लिटर
पाणी, बिव्हेरीया बॅसियाना 4 ग्रॅम / 1 लिटर पाणी किंवा 1 ग्रॅम धुण्याची पावडर /
1 लिटर पाणी , निंबोळी तेल 5 मिली / 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे
सोयाबीन - उंट अळी तंबाखुवरील पाने
खाणारी अळी आढळल्यास भविष्यात अळींची संख्या वाढल्यास बिव्हेरीया बॅसियाना @ 40
ग्रॅम / 1 लिटर पाणी किंवा क्विनॉलफॉस 25 EC@ 30 मिली/ 10 लिटर पाण्यात किंवा
प्रोपेनोफॉस 50 EC @ 25 मिली / 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे उंट अळीचा प्रादुर्भावासाठी
पिकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करुन अंडीपज व अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात SLNPV@250 LE/
हेक्टर किंवा निंबोळी अर्क 5 टक्के किंवा बिव्हेरीया बॅसियाना 4 ग्रॅम / 1
लिटर पाणी किंवा 1 ग्रॅम धुण्याची पावडर / 1 लिटर पाणी किंवा क्विनॉलफॉस 25 EC @
20 मिली/ 10 लिटर पाण्यात किंवा अझॅडीरॅक्टीन 1500 PPM @ मिली / 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारावे सोयाबिन वरील चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान
पातळीच्यावर गेल्यास 7 दिवसांच्या आत डायमेथोएट 30 EC@ मिली / 10 लिटर किंवा
ट्रायझोफॉस 40 EC@ 16 मिली / 10 लिटर किंवा इथोफेनप्रॉक्स 52 मिली / 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारावे
No comments:
Post a Comment