वृत्त क्र :- 554 दिनांक :- 16 ऑगस्ट 2013
रजेसिंग वसावे यांना
भावपूर्ण निरोप
जळगांव, दि 16 :- जिल्हा माहिती
अधिकारी रजेसिंग वसावे यांची पदोन्नतीवर उपसंचालक (माहिती / प्रशासन ) या पदावर
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे बदली झाली असुन धुळे येथील
जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी, जळगांव
या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला.
माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांतर्फे वसावे यांना आज शाल, श्रीफळ व
भेट वस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात
आला यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री
इगवे यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास सर्वश्री सुरेश सानप, राजेंद्र
येवले, भालचंद्र पाटील, मनोहर पाटील, श्रीमती उषा लोखंडे, श्री प्रकाश मोरेकर, अरुण सोनवणे, अशोक मोराणकर, उत्तम अहिरे,
प्रमोद भंगाळे, पंकज ठाकूर आदि उपस्थित होते.
* * * * * *
वृत्त क्र :- 555 दिनांक :- 16 ऑगस्ट 2013
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक
शिष्यवृत्तीसाठी लागणारे कागदपत्रे
जळगांव, दि 16 :- माजी सैनिक /
विधवाच्या ओळखपत्रांची छायांकित प्रत डिस्चार्ज पुस्तकाचे पहिले पृष्ठ आणि फॅमिली
डिटेलच्या पृष्ठाची किंवा रेशन कार्डाची सांक्षाकित केलेली छायांकित प्रत,
गुणपत्रिकेची सांक्षाकित केलेली प्रत, बोनाफाईड दाखला ( शिकत असल्याचे प्रमाणपत्र
), विद्यालय / महाविद्यालयाकडून पाल्यास शिष्यवृत्ती मिळते किंवा नाही व मिळत
असल्यास किती मिळते याबाबतचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांचे प्रमाणपत्र सादर करावे.
माजी
सैनिकांच्या पहिल्या तीन पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल अर्जदाराने
त्यांच्या वैयक्तिक अर्जामध्ये कितव्या क्रमांकाचा पाल्य आहे याचा स्पष्ट उल्लेख
करावा माजी सैनिक / विधवेची मुलगी
(वयाच्या 18 वर्षावरील) असल्यास अविवाहित असल्याचा व अवलंबित असल्याबाबतचा दाखला
सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले
आहे.
* * * * * *
वृत्त क्र :-
556
दिनांक :- 16 ऑगस्ट 2013
महिला व बाल विकास विभागातर्फे
जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
जळगांव, दि 16 – महिला व बालविकास
विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. या
सप्ताहात कुपोषण निर्मुलन, बाळाच्या वाढीसाठी मातेच्या दुधाचे अनन्य साधारण महत्व,
स्तनपान विषयक विविध गैरसमज, अंधश्रध्दा कमी करणे, या विषयावर जळगांव मनपा
क्षेत्रातील शिवाजीनगर, हरी विठ्ठल नगर, खंडेराव नगर, तांबापुरा, तुकारामवाडी,
समतानगर, हुडको, पिंप्राळा येथील विविध
अंगणवाडयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प
अधिकारी श्री आर एम सिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
प्रकल्पातील सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले
* * * * * * *
No comments:
Post a Comment