वृत्त
क्रमांक -533 दिनांक- 7 ऑगस्ट 2013
शासकीय ध्वजारोहणाचा
कार्यक्रम 9.05 वाजता
जळगांव, दि. 7 :- दिनांक 15 ऑगस्ट 2013 रोजी स्वातंत्र्य
दिनाचा 66 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी
ठिक 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. जळगांव शहरातील
जास्तीत जास्त नागरिकांना या मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी दिनांक
15 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा
कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला
अथवा संस्थेला आपला स्वत:च्या ध्वजारोहणाचा समारंभ करावा असे वाटत असेल तर त्यांनी
त्यादिवशी सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 9.35 च्या नंतर करावा. त्याप्रमाणे
उपरोक्त कार्यक्रमास जळगांव शहरातील नागरिक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, स्वातंत्र्य
सैनिक , शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन
जिल्हाधिकारी जळगांव यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
0000
वृत्त
क्रमांक -534 दिनांक- 7 ऑगस्ट 2013
मध्य रेल्वेत माजी
सैनिकांसाठी विविध पदांसाठी भरती
जळगांव, दि. 7 :- जळगांव जिल्हयातील
माजी सैनिकांना मध्य रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध प्रकारची पदे
भरण्याकरीता मध्य रेल्वेने रोजगार समाचार आणि एम्प्लॉयमेंट न्युज या
वर्तमानपत्रामध्ये दिनांक 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2013 रोजी जाहिरात प्रसिध्द केली
आहे. अर्ज पोहाचण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2013 आहे. तरी जास्तीत जास्त माजी
सैनिकांनी सदर पदासाठी अर्ज करावे असे आवाहन माजी कॅप्टन मोहन कुळकर्णी , जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.rrccr.com
ही वेबसाईट पहावी किंवा दुरध्वनी क्रं 022 -67451737 / 23780972 वर संपर्क करावा.
00000000
वृत्त
क्रमांक -535
दिनांक- 7 ऑगस्ट 2013
परिवहन विभागास दिलेल्या व
न वटलेल्या धनादेशाबाबतची
महसुली वसुली
जळगांव, दि. 7 :- मोटार वाहन विभागातील
महसुली जमेकरीता सादर करण्यात आलेले धनादेश बँकेमार्फत वटवण्यात न आल्यास धनादेश
सादर करणा-या पक्षकारांकडून त्वरित व्याजासह रोखीने रक्कम वसुल करण्यात यावी व
दोषी व्यक्तींविरुध्द कार्यवाही करण्यात यावी. असे परिवहन आयुक्त, मुंबई
कार्यालयातून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार उप प्रादशिक परिवहन कार्यायात
आलेले धनादेश बॅकेमार्फत वटवण्यात न आल्यास महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नियम 100
(ब) नुसार अशा धनादेश सादर करणा-या पक्षकारांकडून (वाहन मालकांकडून) त्वरीत
व्याजासह रोखीने रक्कम वसूल करण्यात येईल व दोषी व्यक्तींविरुध्द Negotiable Instrument Act (Ammended) चे कलम
138 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे श्री. सुभाष वारे, उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी, जळगांव हे कळवितात. 00000000
No comments:
Post a Comment