Monday, 12 August 2013

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यासाठी परीक्षेस प्रविष्ठ होण्याची दुसरी संधी उपलब्ध



वृत्त क्र  :-  538                                                                                                 दिनांक  :- 12   ऑगस्ट 2013
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होणा-या
विद्यार्थ्यासाठी परीक्षेस प्रविष्ठ होण्याची दुसरी संधी उपलब्ध
           जळगांव, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळ, नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविलयाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. 12 वी ) परीक्षा फेब्रुवारी - मार्च 2013 परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यास श्रेणीसुधार योजनेअंतर्गत सप्टेंबर - ऑक्टोंबर 2013 व फेब्रुवारी - मार्च 2014 अशा दोन संधी (पूर्वीच्या एक संधी ऐवजी) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
           श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलेल्या ( फेब्रुवारी - मार्च 2013) परीक्षेनंतर लगतची (सप्टेंबर -ऑक्टोंबर 2013) परीक्षा ही संधी अनिर्वाह राहील व सलग तद्नंतरच्या              (फेब्रुवारी -मार्च 2014) परीक्षेस प्रविष्ठ होण्याची जादाची  दुसरी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घेवून ज्या विद्यार्थ्याना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रथम सप्टेंबर - ऑक्टोंबर 2013 परीक्षेचे आवेदनपत्र विहीत मुदतीत संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत इयत्ता 10 वी प्रचलित पध्दतीनुसार व इयत्ता 12 वी ऑनलाईन /  प्रचलित पध्दतीनुसार मंडळ कार्यालयात सादर करावे. असे आवाहन  विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * *
वृत्त क्र  :- 539                                                                                              दिनांक  :- 12 ऑगस्ट 2013  
व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी
                                प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
           जळगांव, दि. 12 :- जिल्हयातील व्यसनमुक्तीसाठी कार्य करणा-या पुढील लेखक, कवि, पत्रकार / संपादक व साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, किर्तनकार, प्रवचनकार, लोक कलावंत, शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवा मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, बचत गट व क्रीडा मंडळे, शाळा व महाविद्यालय, वृत्तपत्रे ( हिंदी, इंग्रजी, मराठी), इलेक्ट्रॉनिक मिडीया, कारखाने उद्योग व्यवस्थापन, मजुर संघटना या गटातून एकूण 51 पुरस्कारार्थीना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्काराव्दारे  सन्मानित करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव या कार्यालयाकडे संबंधितांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, जळगांव यांनी केले आहे.

* * * * * * *

No comments:

Post a Comment