Thursday, 1 August 2013

स्वयं सहाय्यता शाळांचे प्रसतव पाठविण्यास मुदतवाढ



         जळगांवा, दि 1 :- महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 जुलै 2013 अन्वये केलेल्या दुस-या सुधारणेनुसार स्वयंअर्थसहायित शाळा ( स्थापना व विनिमयन) अधिनियम 2012 अंतर्गत सन 2014-15 पासून प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक या स्तरावरील नवीन शाळा किंवा दर्जावाढीने वर्ग सुरु करणेसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत दिनांक 8 ऑगस्ट 2013 पर्यत वाढविण्यात आलेली आहे
             स्वयं अर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमयन) अधिनियम 2012 या अधिनियांतर्गत अजूनही ज्या शैक्षणिक संसथाना सन 2014-15 मध्ये प्राथमिक / प्राथमिक  / माध्यमिक / उच्च माध्यमिक या स्तरावरील नवीन शाळा किंवा दर्जावाढीने वर्ग सुरु करावयाचे असतील, त्यांनी संबंधित जिल्हयांच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधून रुपये 5000/- रक्कमेचे चलन भरुन दिनांक 19 जानेवारी 2013 च्या अधिनियमासोबत देण्यात आलेल्या अनुसूची –क मधील नमुनयात ऑफलाईन पध्दतीने दिनांक 8 ऑगस्ट 2013 अखेर परिपूर्ण भरुन ते अर्ज जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावे असे शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांनी कळविले आहे
                                                               0000


वृत्त क्र  :- 521                                                                              
आचारसंहितेमुळे लोकशाही दिन नाही

            जळगांव, दि 1 - लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो परंतू  महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने त्याबाबतची आचारसंहिता लागू  करण्यात आलेली आहे आचार संहिता कालावधीत दिनांक  5 ऑगस्ट 2013 रोजीच्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही  अशा शासनाच्या सुचना असल्यामुळे आचारसंहिता संपेपावेतो लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही याची सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व नागरिक यांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी जळगांव यांनी कळविले आहे

No comments:

Post a Comment