Wednesday, 21 August 2013

अमळनेर प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस रिक्तपदाची भरती



अमळनेर प्रकल्पा अंतर्गत
अंगणवाडी सेविका, मदतनीस रिक्तपदाची भरती

            जळगाव, दि 21 :-  एकात्मिक बाल विकास सेवा योजना अमळनेर  प्रकल्पा अंतर्गत 241 अंगणवाडी केंद्र असून ग्रामपंचायतींच्या गावी सेविका व मदतनीसाची रिक्तेपदे आहेत. यासाठी स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
           अंगणवाडी सेविका. मदतनीस या रिक्तपदे असलेल्या  ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे - हिंगोणे खुर्द आजणवाडी - अंगणवाडी सेविका -1, भिलाली-  अंगणवाडी सेविका -1, जवखेडा मदतनीस -1,  मंगरुळ मदतनीस -2, चिमणपुरे - 1
               अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा.
* * * * * * *

No comments:

Post a Comment