Friday, 2 August 2013

माजी सैनिकांना रोजगाराची संधी



       जळगांव, दि. 2 :- भुमि अभिलेख विभागामध्ये विविध संवर्गातील माजी सैनिकांसाठी गट क आणि गट ड ची पदे आरक्षित ठेवण्यात आली आहे. सदर पदासाठी अर्ज ऑनलाईन करणे आवश्यक आहे. त्याबाबतची जाहिरात देण्यात आली आहे. जाहिराती बाबतची सविस्तर माहिती http;//oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुर्णत: संगणीकृत असल्याने ऑनलाईन अर्जाव्यतीरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. तरी जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त पात्रता धारक माजी सैनिकांनी उपरोक्त पदासाठी अर्ज करावेत असे आवाहन कॅप्टन मोहन कुलकर्णी , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment