वृत्त विशेष दिनांक 22.08.2013
शहीद गणेश अहिरराव यांच्या कुटुंबियांना रु.5 लाखाचा धनादेश प्रदान
चाळीसगाव दिनांक 22 :- उत्तराखंड
येथे आलेल्या महाजलप्रलयात अडकलेल्या भाविकांची हेलीकॉप्टरव्दारे सुटका करीत असतांना झालेल्या अपघातात तालुक्यातील वडाळा-वडाळी चे रहिवाशी शहीद गणेश
अहिरराव यांच्या कुटुंबियांना मदत म्हणुन ठाकुर एज्युकेशन
ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने रु.5 लाखाचा धनादेश आज प्रदान करण्यात आला.
ठाकुर एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई चे आ.रमेश ठाकुर हे
कांदिवली, मुंबई येथील आमदार असुन आपल्या ट्रस्ट मार्फत देशाच्या संरक्षणार्थ शहीद झालेल्या मुंबई, बेटावद तसेच वडाळा-वडाळी येथील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी एकुण 21 लाखाचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता. सदर मदतीचा धनादेश शहीद जवानांच्या
कुटुंबाला प्रदान करण्यासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या वतीने उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ
यांचे हस्ते आज वडाळा-वडाळी येथील शहीद
गणेश अहिरराव यांच्या पत्नी श्रीमती योगिता गणेश अहिरराव यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी वडाळा-वडाळी चे सरपंच शिवाजी आमले तसेच पोलीस पाटील निलेश अहिरराव, चाळीसगावचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे, प्रांत कार्यालयातील कैलास सैंदाणे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
*
* * * *
वृत्त विशेष दिनांक 22.08.2013
जिल्हयातील मेंढपाळाना लोकर सुधार प्रकल्पातंर्गत
प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
चाळीसगाव दिनांक 22 :- केंद्रीय लोकर विकास मंडळ, वस्त्रोद्योग, मंत्रालय, जोधपुर पुरस्कृत मेंढी व लोकर सुधार
प्रकल्प योजनेतंर्गत जळगाव जिल्हयातील सन 2013-2014 पासुन
पुढील तीन वर्षासाठी नियमित स्वरुपात मेंढयाचे आरोग्य सुविधा, पैदास कार्यक्रम, मेंढयांची लोकर कातरर्णी, मेंढी व शेळी पालन
प्रशिक्षण आदि बाबींचा लाभ पुण्यश्लोक
अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास
प्रक्षेत्र, बिलाखेड ता.चाळीसगाव जि.जळगांव यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.
तरी सदर प्रशिक्षण
शिबिराचा जिल्हयातील सर्व मेंढी पालकांनी लाभ घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, बिलाखेड, ता.चाळीसगाव दूरध्वनी क्र. 02589-222457 येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रक्षेत्र
व्यवस्थापक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्र बिलाखेड, ता.चाळीसगाव यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
*
* * * *
No comments:
Post a Comment