Saturday, 17 August 2013

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 12) विशेष अतिविलंब शुल्क अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदतवाढ



उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 12) विशेष अतिविलंब शुल्क
 अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदतवाढ
       जळगांव, दि 17 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत सप्टेंबर , ऑक्टोंबर 2013 मध्ये आयोजित करण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यार्ची नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र स्विकारण्याची मुदत संपल्यानंतरही  श्रेणी, तोंडी, प्रात्याक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाच्या कालावधीपर्यत प्रतिदिनी रु 50 याप्रमाणे अतिविलंब शुल्क, अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्याक्षिक परीक्षेच्या अगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील शासनाचे दिनांक 11 फेब्रुवारी 2013 च्या पत्रानुसार अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारुन आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा पुढीप्रमाणे कळविण्यात आल्या आहेत
(विलंब शुल्कानंतर आवेदनपत्र नेहमीच्या पध्दतीने स्विकारावयाची आहेत)
              उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 12) विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु 100/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे ) सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2013 पर्यत, अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत ( रु 200/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे) मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट पासून मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2013 पर्यत
               पूर्वीच्या प्रचलित पध्दतीप्रमाणे                                  
           वरील तारखांची सर्व संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी नोंद घेवून ज्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र सादर करावयाची असतील त्यांनी आवश्यक त्या पूर्ततेसह कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आवेदनपत्र निर्धारित दिनांकापूर्वी मंडळ कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत वरील तारखेनंतर कोणतेही आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक  विभागीय मंडळ, नाशिक यांनी केले आहे           
                                                      * * * * * * *

No comments:

Post a Comment