वृत्त क्र :- 566 दिनांक :- 23 ऑगस्ट 2013
निवडणूक निरीक्षक प्रकाश महाजन
यांची मतदान केंद्रास भेट
जळगाव, दि. 23 :- जळगाव शहर महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 1 सप्टेंबर 2013 रोजी होत आहे. निवडणूक निरीक्षक तथा धुळयाचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज शहरातील संवेदनशील मतदान केंद्र तसेच इतर मतदान केंद्रास भेट देवून पहाणी केली. यावेळी त्यांच्या सोबत अपर पोलीस अधीक्षक एन अंबिका, आयुक्त संजय कापडणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तुकाराम हुलवळे आदि अधिकारी उपस्थित होते.
श्री. महाजन यांनी मतदान केंद्रात आवश्यक सुविधा तत्काळ निर्माण करण्याच्या सुचना दिल्या अपंग मतदारांसाठी रॅम्प, विद्युत पुरवठा, मतदान केंद्राचा मार्ग आदिबाबत सुचना दिल्या. मतदान केंद्राना भेटी देण्यापूर्वी अजिंठा विश्रामगृहात श्री. महाजन यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांची बैठक घेतली. बैठकीस पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मतदानासाठी आवश्यक असलेले साहित्य कागदपत्र उपलब्ध पोलिस बंदोबस्त, आराखडा संदर्भातही चर्चा झाली.
निवडणुक निरीक्षक प्रकाश महाजन यांनी शिवाजी नगर येथील खुबचंद सागरमल हायस्कुल, नगर पालिका शाळा क्रमांक 15, रामलाल चौबे शाळा, उर्दू शाळा क्र. 18,माता रमाई आंबेडकर माध्यमिक विद्यालय मेहरुण या मतदान केंद्रांना भेट देऊन पहाणी केली.
* * * * * *
वृत्त क्र :- 567 दिनांक :- 23 ऑगस्ट 2013
दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी
27 ऑगस्ट रोजी भरती मेळावा
जळगांव, दि. 23 :- जळगांव जिल्हयातील 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती सत्र ऑक्टोंबर 2013 करीता शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत अप्रशिक्षित व्यवसायांकरीता दिनांक 27 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता मेस हॉल औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगांव येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. विहीत शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य श्री. व्ही. एम. राजपुत, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. टी. बी. चौधरी यांनी पत्रकान्वये केले आहे.
या भरती मेळाव्याकरीता जिल्हयातील विविध आस्थापना अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सर्व उमदेवारांना एकाच ठिकाणी एकाच वेळी कमी खर्चात विविध आस्थापनांना मुलाखती देता याव्यात याकरिता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
* * * * * *