Thursday, 4 July 2024

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकिय वसतीगृहामध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू

                                     इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकिय

वसतीगृहामध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू

 जळगाव, दिनांक 4 जुलै, 2024 (जिमाका वृत्त) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला मुलीसाठी जळगांव येथे शासकिय वसतीगृह सुरू करण्यात आलेले आहे, सदर वसतीगृहामध्ये इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणा-या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुला-मुलीना शासकिय वसतीगृहामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक १९ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयातील अटी व शर्ती च्या अधिन राहून प्रवेश देण्यात येईल.

 वसतिगृहात प्रवेशाकरीता नियम व अटी पुढीलप्रमाणे :

 विदयार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, सक्षम प्राधिका-याने दिलेला इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे वैच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, अनाथ दिव्यांग व आर्थिक मागास घटक वगळता इतर प्रवर्गातील विदयार्थ्यांनी सक्षम प्राधिका-याने दिलेले वैध पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, अर्जदार विदयार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा अधिक नसावे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे, विदयार्थ्यांने राज्य शासन विदयापीठ अनुदान आयोग अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद भारतीय वेदयकिय शिक्षण परिषद/वैदयकिय परिषद भारतातील फॉर्मसी परिषद वास्तुका परिषद कृषी परिषद महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त महाविदयालयामध्ये व मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश घेतलेला असावा, उच्च शिक्षणसाठी (व्यावसायिक तसच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना वसतीगृहामध्ये गुणवत्तेनुसार तसेच संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात  येतील. याकरिता इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.

 या वसतिगृहामध्ये प्रवेश हा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. उर्वरीत सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जळगांव यांच्याकडे शासन परिपत्रक क्र.बग्यो-२०२३/प्र.क्र.१२/योजना-५ दि.१३.०३.२०२३ मधील विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावी लागेल, विदयार्थी स्थानिक नसावा. (विदयार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था त्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विदयार्थी रहिवासी नसावा) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/CGPA चे गुण असणे आवश्यक राहील, वसतिगृहासाठी जास्त अर्ज आल्यास गुणवत्तेनुसार विदयार्थ्यांची निवड करण्यात येईल.

 शासकिय वसतीगृहाचे सन २०२४-२५ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक :

 

अ.क्र.

बाब

ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी

 

पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे

 

पहिल्या निवड यादीनुसार विदयाथ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत

 

रिक्त जागेवर दुस-या प्रतिक्षा यादीमधील विदयार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करणे

दुस-या यादीतील विदयार्थ्यांना प्रवेश देणे

1

2

3

4

5

6

7

 

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांसाठी

दि.०१.०७.२०२४   

         ते दि.२१.०७.२०२४ 

दि.३०.०७.२०२४

 

दि.१०.०८.२०२४

 

दि.१६.०८.२०२४

 

दि.२०.०८.२०२४

 

 अधिक माहितीसाठी कार्यालयाचे नाव व पत्ता : सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक  न्याय  भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment