Friday, 5 July 2024

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न

 



जिल्हाधिकारी यांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल 
            व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न

जळगाव,  दिनांक 5 जुलै, 2024  (जिमाका) : दिनांक ४ जुलै २०२४ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात यावल प्रकल्पांतर्गत असलेल्या १७ शासकीय आश्रम शाळा. शासकीय वस्तीगृह १७ तसेच ३२ अनुदानित आश्रम शाळांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून गावात वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली तसेच आश्रमशाळेमधील प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्यास एका झाडांचे पालकत्व देण्यांत आले असुन, प्रत्येक झाड जगावे यासाठी ठिंबक सिंचन द्वारे पाणी देण्यांसाठी नियोजन आहे.

उ‌द्घाटन समारंभ सकाळी नऊ वाजता शासकीय आश्रम शाळा डोंगर कठोरा तालुका यावल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले. उप वनसंरक्षक, जळगाव जमीर शेख, प्रकल्प अधिकारी यावल प्रकल्प अरुण पवार, तहसीलदार श्रीमती नाझीरकर मॅडम यावल, यावेळी उपस्थित होत्या.

             जिल्ह्यातील बारा वन विभागाच्या रोपवाटिकेमधून ११०९१ रोपांचा मोफत पुरवठा करण्यात आला. सर्व आश्रम शाळांमध्ये एकाच दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आश्रम शाळांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वृक्ष रोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन सोडतात. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते.   

      तसेच वृक्ष जमिनीची धूप थांबवतात. पाण्याची शुद्धता राखतात व जैवविविधता वाढवतात वृक्षामुळे उष्णतेची लाट कमी होते आणि पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत होते.हवामान बदल हे एक गंभीर आव्हान आहे. आणि वृक्ष लागवड हे त्याविरुद्ध एक प्रभावी उपाय आहे. वृक्ष वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंची मात्रा कमी करतात. ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी होते. त्यामुळे. वृक्ष लागवड हा पर्यावरण रक्षण व हवामान बदलावर नियंत्रण आणण्यासाठी एक महत्वपूर्ण उपाय आहे.

            या वृक्ष रोपण कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पर्यावरणाची हमी देईल. उ‌द्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना  व उपस्थितांना संदेश दिला की. वृक्ष लागवड हे आपले कर्तव्य आहे आणि त्यामुळे मिळणारे फायदे खूप मोठे आहेत. वृक्षा लागवडीमुळे पर्यावरण सुधारते. हवेतील प्रदूषण कमी होते. आणि भविष्यातील पिढ्‌यांसाठी सुरक्षित पर्यावरणाची हमी मिळते प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की. ते या संदेशाला आपल्या जीवनात लागू करून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा.

             कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी यावल प्रकल्प अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवन पाटील व सहाय्यक प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभाग प्रकल्प कार्यालय यावल आर एम लोवणे यांनी केले.

0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment