मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई, दिनांक 1 जूलै, 2024 : महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या राज्यातील शेतकरी तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रात सक्रिय, अशा सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
0 0 0 0
दि.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई, दिनांक 1 जुलै, 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित-धवल क्रांतीचे प्रणेते दि. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment