साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीस 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, दिनांक 16 जुलै, 2024 (जिमाका वृत्त) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विदयार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण. प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विदयार्थी/विदयार्थीनींना महामंडळाकडुन जेष्ठता व जास्त गुणक्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम 03 ते 05 विदयार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे, त्यामुळे दि. 25 जुले 2024 च्या आत संपुर्ण कागदपत्रानिशी मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विदयार्थी/विद्यार्थीनीनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. उशिरा आलेल्या कागद पत्र अर्जाचा मुख्यालया मार्फत विचार करण्यात येणार नाही. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
अर्ज करतांना मार्कशीट (गुणपत्रक), शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीयादाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, महाबळरोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातणुर कॉलनी, जळगाव फोन नं-0257-2263294 कार्यालयात संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment