सामाजिक न्याय विभागामार्फत
शहरी भागात रमाई आवास योजना
जळगाव, दिनांक 4 जुलै,
2024 (जिमाका वृत्त) : जिल्हयातील नगरपरीषदा व महानगरपालिका
क्षेत्रातील अनुसूचित
जाती व नवबोध्द व्यक्तीना स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर
बांधून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत रमाई आवास योजना राबविण्यात
येत आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी दोन लाख पन्नास हजार
रुपये अनुदान देण्यात येते.
योजनेचे निकष : लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित
जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थ्यांकडे पक्के घर नसावे किंवा लाभार्थी बेघर
असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रूपयापर्यंत असावे.
योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक
बाबी : ७/१२ उतारा,
मालमत्ता नॉदपत्र, मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक, घरपटटी, पाणीपटटी, विद्युत
बिल या कागदपत्रापैकी एक, सक्षम प्राधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत,
सक्षम प्राधिका-यांने दिलेला उत्पन्नाचा दाखल, दि १/२/१९९५ च्या किंवा मतदार यादितील
नांवाचा उतारा, निवडणुक ओळखपत्र, रेशनकार्ड, मालमत्ता कर भरल्याची पावती, सध्याचा कच्च्या
घराचा फोटो, तहसिलदार यांनी दिलेले रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट.
योजनेसाठी अर्ज करावयाचे ठिकाण
: अर्जदाराने
संबधित महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपालिका, येथे परीपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन
योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment