"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, दिनांक 4 जुलै, 2024 (जिमाका वृत्त) : महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.मबावि 2024/प्र.क्र.96/कार्या-2 दिनांक 28 जुन, 2024 व दिनांक 3 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" हि योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
योजनेत लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा घटस्फोटित. परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिला.
योजनेचे स्वरूप : प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यात पेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) दरमहा रुपये १५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रुपये १५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कया योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक १ जुलै, २०२४ ते ३१ ऑगष्ट, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तसेच दिनांक ३१ ऑग्स्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक १ जुलै, २०२४ पासून दरमहा रुपये १५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता : लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या निराधार व कुटूंबातील एक पात्र अविवाहित महिला, किमान वयाची २१ वर्ष व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता : ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे, कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / मंडळ भारत सरकार किवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये किया सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास, सदर लाभार्थी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणा-या आर्थिक योजनेव्दारे रुपये १५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विदयमान किंवा माजी खासदार / आमदार आहे, ज्यांच्याकडे चारचाकि वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
योजनेमध्ये लाभ मिळणेकरीता आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थाचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकि कोणतेही एक ग्राहय धरण्यात येईल. रुपये २.५० लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध प्रमाणपत्रातुन सुट देण्यात आलेली आहे, असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास / १५ वर्षापूर्वीचे १. रेशनकार्ड २. मतदार ओळखपत्र ३. जन्म प्रमाणपत्र ४. शाळा सोडल्याचा दाखला.
अर्ज करण्याची पध्दत : अर्ज निःशुल्क अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / सेतु सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक यांचेकडे भरता येईल. लाभार्थ्यांना स्व्ःता "नारी शक्ती दूत अॅपवर अर्ज करता येईल. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यानी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव आणि डॉ.वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment