“ सक्षम
करुया युवा व भावी मतदार ”
या
घोषवाक्याने मतदार जनजागृतीवर भर
:प्रातांधिकारी
शरद पवार
चाळीसगांव,
दिनांक 24 :- भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस, सातव्या राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त बुधवार 25 जानेवारी 2017 रोजी शासकीय कार्यालयांत मतदार
जनजागृतीसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याचे शरद पवार, निवडणूक निर्णय
अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, चाळीसगांव यांनी कळविले आहे.
दिनांक 25 जानेवारी
1950 हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या दिनानिमित्त संपूर्ण देशात 25
जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील
भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र समारंभपूर्वक प्रदान करणे, रॅली काढणे,
रांगोळी स्पर्धा घेणे, प्रबोधनात्मक चर्चासत्र घेणे, मतदार जागृतीचे विविध
उपक्रमांचे आयोजन करुन “ सक्षम
करुया युवा व भावी मतदार ” या घोषवाक्याचा प्रचार व प्रसारासाठी विविध
उपक्रम राबवून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येईल.
राष्ट्रीय मतदार
दिनानिमित्त 25 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11:00 वाजता प्रत्येक कार्यालयात अधिकारी
व कर्मचारी एकत्र येवून मतदार नोंदणी आणि मतदान जनजागृतीसाठी सामूहिक प्रतिज्ञा
घेतील. तर निवडणूकीसाठी नियुक्त केलेले ब्रॅण्ड ॲम्बेसेडर यांचे भित्तीपत्रके
प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसारीत करण्यात येणार आहेत.
महिला विशेषत: नवविवाहीत
महिला व नवमतदारांकडून मतदार नोंदणी संदर्भात नमुना क्रं.6 प्राप्त करुन घेने,
युवक-युवतींमध्ये मतदानाच्या हक्का विषयी जनजागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने
शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा या सारख्या विविध स्पर्धांचे
आयोजन करुन “सक्षम
करुया युवा व भावी मतदार” कार्यक्रम साजरा करण्याच्या सुचनाही निवडणूक
आयोगाने दिल्या आहेत.
“राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घ्यावयाची
प्रतिज्ञा”
मतदारांसाठी प्रतिज्ञा
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून
याद्वारे प्रतिज्ञा करतो, की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि
मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व
प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या
विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू !
”
तालुका प्रशासनामार्फत राष्ट्रीय मतदार
दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमामध्ये विशेषत: नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग
नोंदवून मतदार जागृतीसाठी योगदान देण्याचे आवाहन उप विभागीय अधिकारी शरद पवार तसेच
तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment