जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी
आजपासून उमेदवारी अर्ज स्विकारणार
चाळीसगांव,दिनांक 27:- जिल्हा परिषदेच्या एकूण 67 गटापैकी चाळीसगांव तालुक्यातील
7 गट तर पंचायत समितीच्या एकूण 134 गणांपैकी चाळीसगांव तालुक्यातील 14
गणांच्या निवडणूकीची अधिसूचना आज दिनांक 27 जानेवारी पासून जारी करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या www.panchayatelection.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी दिनांक 27 जानेवारी
ते 1 फेब्रुवारी, 2017 (दुपारी 02:30 पर्यंत) राहणार आहे, तर रविवार दिनांक 29 जानेवारी, 2017
रोजी सार्वजनिक सुटी असली तरी सकाळी 11:00 ते दुपारी 03:00 दरम्यान
नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
खालील प्रमाणे
नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा शेवटचा
दिनांक बुधवार दिनांक 01 फेब्रुवारी, 2017
रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत असून चाळीसगांव तालुक्यातील मतदार विभागाचा तपशिल
पुढील प्रमाणे गट क्रं.61 बहाळ-कळमडू (गण क्रं. 121/122), गट क्रं.62 दहिवद-मेहुणबारे
(गण क्रं. 123/124), गट क्रं.63 सायगाव-उंबरखेड (गण क्रं. 125/126), गट क्रं.64 करगाव-टाकळी
प्र.चा.(गण क्रं. 127/128), गट क्रं.65 पातोंडा-वाघळी (गण क्रं. 129/130), गट
क्रं.66 रांजणगाव-पिपरखेड (गण क्रं. 131/132), गट क्रं.67 देवळी-तळेगाव (गण क्रं. 133/134)
या मतदार विभागांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण
हे तहसिल कार्यालय, चाळीसगांव आणि मतमोजणी करण्याचे ठिकाण हे नानासाहेब
य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, किमान कौशल्य विभागाचा हॉल, चाळीसगांव असा राहणार आहे.
जिल्हा
परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता चाळीसगांव तालुक्यातील एकूण 2
लाख 46 हजार 247 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 1 लाख 31 हजार 532
पुरूष मतदार तर 1 लाख 14 हजार 715 स्त्री मतदारांचा
समावेश असणार आहे.
रविवार
दिनांक 29 जानेवारी, 2017 रोजी सार्वजानिक सुट्टी असली तरी सकाळी 11:00 ते दुपारी
03:00 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार असून याची सर्व इच्छुक
उमेदवारांनी नोंद घ्यावी.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment