Tuesday, 24 January 2017

प्रजासत्ताक दिनाचा मुख्यसमारंभ पोलीस परेड मैदानावर

प्रजासत्ताक दिनाचा मुख्यसमारंभ पोलीस परेड मैदानावर
                
            चाळीसगांव, दिनांक 24:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 67 वा वर्धापन दिनानिमित्त गुरूवार दिनांक 26 जानेवारी 2017 रोजी सकाळी ठीक 09:15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ चाळीसगाव महसूल उप विभागाचे उप विभागीय अधिकारी शरद पवार यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
           चाळीसगाव तालुक्याच्या या मुख्यध्वजारोहण सोहळयास शहरातील तसेच परिसरातील अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी 26 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 08:30 ते 10:00 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभाचे आयोजन करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेस आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 08:30 वाजेपूर्वी  किंवा 10:00वाजेनंतर करावा .
               भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभास शहरातील तसेच तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर ,विद्याथी व नागरिकांनी मोठया संखेने उपस्थित रहावे असे आवाहन  चाळीसगांवचे तहसिलदार कैलास देवरे यांनी एका  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment