आचारसंहितेच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी
स्थिर
सर्वेक्षणासह व्हिडीओ सर्वेक्षण पथकांची नेमणूक
:
प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव,
दिनांक 17 :- जिल्हा
परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या पथकांनी चोख कामगिरी बजावून अहवाल सादर
करण्याच्या सुचना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक-2017
तथा प्रातांधिकारी शरद पवार यांनी दिल्या.
निवडणूकी
संदर्भात रोख रकमेचे वाटप, मद्याची अवैध मार्गाने वाहतुकीसह इतर तक्रारी प्राप्त
होतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तालुक्यातील पिलखोड, मेहुणबारे, हिंगोणे
सीम, हिरापुर, बोढरे, जामडी प्र.ब. या सहा ठिकाणांवर स्थिर सर्वेक्षण पथकांची
नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील पिलखोड येथील जबाबदारी अमोल भदाणे विस्तार
अधिकारी, मेहुणबारे येथील जबाबदारी प्रतापराव पाटील पशुधन पर्यवेक्षक, हिंगोणे सीम
येथील जबाबदारी अविनाश राठोड कनिष्ठ सहा., हिरापूर येथील जबाबदारी पी.जे.पाटील
कनिष्ठ लिपीक सहा. निबंधक, बोढरे येथील जबाबदारी सतिष सोनवणे वसुली कर्मचारी
सहा.निबंधक तर जामडी प्र.ब. येथील जबाबदारी बाळकृष्ण सोनवणे रोखपाल सहा.निबंधक
यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांसमवेत एका सहाय्यकासह एक पोलीस
कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.
सभा आणि रॅलींवर असणार व्हिडीओ सर्वेक्षण पथकाची नजर
निवडणूकीच्या
अनुषंगाने आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सभा, रॅलींवर व्हिडीओ सर्वेक्षण पथकाची नेमणूकही करण्यात आली
आहे. यासाठी देखील सहा पथके नियुक्त केले असून पथक प्रमुख म्हणून पोपट गाढवे कृषी
पर्यवेक्षक, सुनिल भालेराव कृषी पर्यवेक्षक, सुभाष राठोड कृषी पर्यवेक्षक, मनोहर
गांगुर्डे कार्यालय अधिक्षक पंचायत समिती, प्रदीप सोनवणे आरोग्य विस्तार अधिकारी,
धीरज पाटील कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती या सहा अधिकाऱ्यांसह एक सहाय्यक व
व्हिडीओग्राफरची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके आयोजित सभा, रॅलींचे चित्रीकरण
करुन चित्रीकरणाचा अहवाल आचारसंहिता कक्षाकडे सादर करणार असून सभेच्या ठिकाणी
आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शणास आल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना
अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
या
पथकात नेमणूक केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीत हयगय
किंवा टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अन्वये तसेच पंचायत आणि नगर
पालिका निवडणुक अधिनियम 1995 चे नियम 9 नुसार कारवाई करण्याची तंबी देखील निवडणूक
निर्णय अधिकारी शरद पवार यांनी दिली आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment