Friday, 15 March 2013

ग्राहकांच्या हक्काबाबत ग्राहकांनी जागृत व्हावे -- तहसिलदार दिपक गिरासे



          चाळीसगांव दिनांक 15:-  येथील तालुका प्रशासन ग्राहक पंचायत, चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एस.टी.डेपो आगार कार्यशाळेत आज जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम संपन्न  झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री. विजय नातू होते. यावेळी देखरेख संघ व्यापारी असो.चे अध्यक्ष श्री. प्रदीपदादा देशमुख, नगराध्यक्षा श्रीमतीअनिता चौधरी, तहसिलदार  श्री. दिपक गिरासे, आगार व्यवस्थापक, श्री. अरुण सिया, अ. भा. ग्राहक पंचायतचे सचिव श्री. आण्णा धुमाळ, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रोहिदास पाटील, विद्युत मंडळाचे अधिकारी श्री. सपकाळ आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी श्री. नातू म्हणाले की, ग्राहकांनी आपल्या तक्रारी ग्राहक पंचायतीमध्ये मांडून त्या समन्वयाने सोडवाव्यात. त्यामुळे ग्राहकांनी या कायद्याचा अभ्यास करुन गैरव्यवहारापासून संरक्षण मिळेल. या माध्यमातून ग्राहकांच्या हक्काची कायद्याची ग्राहकांमध्ये जाणीव निर्माण झाली पाहिजे.
तहसिलदार श्री. गिरासे यांनी माणसांच्या दैनंदिन जीवनात खरेदीबाबत घडणा-या विविध प्रसंगाचे उदाहरण देऊन ग्राहकांच्या हक्कांबाबतचे महत्त्व विशद केले. तसेच कोणतीही वस्तू खरेदी केल्यास त्या वस्तुची पावती घेणे आवश्यक आहे. त्यावर दुकारनदाराचे नांव, रजिस्टर ंनबर, वस्तुचे नांव, किंमत, विक्रत्याची सही इत्यांदी बाबींचा समावेश असला पाहिजे. त्याचबरोबर तक्रार कोणी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले.
श्री. प्रदीपदादा देशमुख म्हणाले की, ग्राहकांचे संरक्षण व्हावे म्हणून चळवळ सुरु झाली आहे. ग्राहकांच्या दृष्टीने गैरव्यवहारापासून संरक्षण देणारा ग्राहकाच्या हातातील अस्त्र म्हणून या कायद्याची माहिती ग्राहकांना होणे अत्यंत आवश्यक आहे. या माध्यमातून ग्राहकांनी जागृत होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. अरुण सिया यांनी ए.टी. मंहामंडळाकडून प्रवाशांना देण्यात येणा-या विविध सोयी सुविधांची योजनांची माहिती विशद केली. तसेच प्राप्त होणा-या तक्रांरीचे निराकरण कशाप्रकारे केले जाते याचीही माहिती दिली.
श्री. रोहिदास पाटील म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणतीही वस्तु किंवा सेवा विकत घेणारी व्यक्ती कायद्याने ग्राहक आहे. तसेच ग्राहक दिनाचे कार्यक्रम ग्रामीण भागात घेणे आवश्यक असून असे कार्यक्रम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्याचे यावेळी त्यांनी सुचविले.
            या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळीसगांव एस.टी. डेपातील कर्मचारी श्री. अजबराव कोळजी पाटील, श्री. उध्दव संतोष पाटील, कु. ज्योती भागवत नागरे, श्री. जगतराव वामनराव सोनवणे श्री. धनराज लक्ष्मण वाघ यांना उत्कृष्ट सेवेबद्दल प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर आगार व्यवस्थापक  श्री. अरुण सिया यांनाही प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमातून ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोणातून वजन माप, अन्नभेसळ वीज वितरण, गॅस संबंधीचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
.         तत्पुर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अण्णा धुमाळ यांनी केले तर सुत्रसंचलन ऍ़ड. जितेश पोतदार आभार प्रदर्शन श्री. राजेश अग्रवाल यांनी  केले.
         यावेळी शासकीय अधिकारी, पुरवठा विभागाचे श्री. संदेश निकुंभ, श्री. एस. आय शेख आदी कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment