जळगांव, दि. 2 :- धरणगांव व जळगांव तालुक्यातील
अनेक गावांमधे पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे टंचाई कृती आराखडयातून
विविध उपाय योजना राबवितांना संबंधीत अधिका-यांनी कामात गतीमानता दाखवावी जर
टंचाईच्या काळात संबंधीतांनी कुचराई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल
अशी सूचना कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केली.
पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित जळगांव व
धरणगांव तालुका टंचाई आढावा बैठकीत
ना. देवकर बोलत होते. यावेळी जळगांव तहसिलदार कैलास देवरे, बीडीओ सुनिल
दुसाने, धरणगांव तहसिदार महेंद्र पवार, बीडीओ ए. जी. तडवी, पाणी पुरवठा विभागाचे
कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, भू-जल यंत्रणेचे वैज्ञानिक, पाणी पुरवठा
विभागाचे उप अभियंता जळगांव पंचायत समिती उपसभापती विजय नारखेडे आदि उपस्थित होते.
ना. देवकर यांनी जळगांव तालुका व धरणगांव
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रशासनाकडून राबविण्यात येणा-या विविध उपाय
योजनांची माहिती घेऊन सदरील कामे संथ गतीने होत असल्याबददल नाराजी व्यक्ती केली.
त्यामुळे संबंधीत अधिकारी / कर्मचारी यांनी जलद गतीने व कार्यक्षमपणे कामे
करण्याची सूचना त्यांनी केली.
ज्या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती
निर्माण आहे अशा त्या गावांमध्ये विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण , नवीन बोअरवेल,
तात्पुरती पाणी पुरवठा योजना, बोअरवेलमध्ये पंप टाकणे आदि कामे त्वरित
करावीत त्याकरिता तहसिलदार, गट विकास अधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांनी
सदर गावांची पाहणी करुन पाठपुराव करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली.
धरणगांव तालुक्यातील उखळवाडी, वंजारी,
सोनवद बु//, साळवे, पथराड, गंगापूरी आदि गावांमध्ये पाणी प्रश्न ज्वलंत असून
सदरच्या ठिकाणी प्रशासनाने त्वरीत उपाय योजना कार्यान्वीत करण्याची सूचना
पालकमंत्री देवकर यांनी केली. तसेच जळगांव व धरणगांव तालुक्यातील सर्व संभाव्य
टंचाईग्रस्त गावांच्या सुधारीत योजनांना त्वरीत मान्यता मिळून कामे मार्गी
लावण्याची सूचना त्यांनी केली.
*
* * * * * * * *
No comments:
Post a Comment