Friday, 8 March 2013

महाराष्ट्र कृषि उदयोग विकास महामंडळाकडून रास्त दराने शेती उत्पादनाचा पुरवठा - कृषि राज्यमंत्री

          जळगांव. दि. 8 :- महाराष्ट्र कृषि विकास महामंडळाकडून शेतक-यांना रास्त भावाने शेती अवजारे, खते, पशु खादयाचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतक-यांना कमी काम व कमी खर्चात शेती करणे शक्य होत असल्याचे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
         महाराष्ट्र कृषि उदयोग विकास महामंडळामार्फत हॉटेल सिल्हर पॅलेस येथे विक्रेता परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ना. देवकर बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, उपव्यवस्थापक दिलीप मुंदडा, विभागीय व्यवस्थापक ठोसरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक एन. नाईक व वाल्मिक पाटील, एस. एन. पाटील आदि उपस्थित होते.
          ना. देवकर म्हणाले कृषि उदयोग महामंडळ स्थापनेपासूनच दर्जेदार शेती उत्पादनाचा पुरवठा शेतक-यांना करत असून केंद्रीय कृषि विकास योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. तसेच राज्यात शेती क्षेत्रात यांत्रिक उत्पादनाचा वापर वाढविण्यात  महामंडळ महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
          सदयस्थितीत शेती क्षेत्राला मजुरांचा तुटवडा ही समस्या भेडसावत असून त्यावर प्रभावी उपाय योजना म्हणून शेतीचे यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे. व  ती जबाबदारी महामंडळाकडून चोखपणे बजावली जात असल्याचे ना. देवकर यांनी म्हटले. शेतक-यांना रास्त दराने व तत्परतेने शेती उत्पादने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कृषि उदयोग विकास महामंडळाबरोबरच वितरकांची आहे. त्यामुळे वितरकांनी विनाविलंब शेतक-यांना मागणी करताच उत्पादने पुरविण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. तसेच दुष्काळी  परिस्थितीचा विचार करुन महामंडळाने व‍ वितरकांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंताबर पाटील यांनी केले तर एस. एन. पाटील यांनी आभार मानले.
                

No comments:

Post a Comment