चाळीसगांव दिनांक 14 :- येथील ग्राहक पंचायत शाखा व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यांत येणार असून या निमित्ताने एस.टी. प्रवासी ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, शासकीय अधिकारी यांच्याकडील प्रश्न व अडीअडचणी संबंधी शंका समाधान व एस.टी. डेपो कर्मचारी वंृद यांचा गौरव समारंभ व ग्राहक जागृतीविषयक प्रदर्शन शुक्रवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता येथील एस.टी.डेपो आगार कार्यशाळा, भडगांव रोड, चाळीसगांव येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या दिनानिमित्ताने प्रवासी ग्राहक व एस. टी. कर्मचारी वंृद यांचे ग्राहक हक्कासंबंधी प्रबोधन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगांव शाखा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष ब्रिगेडीअर विजय नातू, उद्घाटक आमदार श्री. राजीवदादा देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून देखरेख संघ व व्यापारी असो.चे अध्यक्ष श्री. प्रदीपदादा देशमुख, नगराध्यक्षा सौ. अनिता चौधरी, पंचायत समिती सभापती श्री. विजय जाधव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍ़ड. रोहिदास पाटील, आगार व्यवस्थापक श्री. अरुण सिया हे उपस्थित राहणार आहेत.
या जागतिक दिनानिमित्ताने ग्राहक प्रबोधनाकरीता वजनमाप, अन्न भेसळ, गॅस संबंधीचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व प्रवासी ग्राहक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री. दिपक गिरासे व ग्राहक पंचायत समितीचे सचिव श्री. अण्णा धुमाळ यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment