मुंबई,
दि. 4: मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या
लोकशाही दिनी तीन अर्जांवर सुनावणी करण्यात आली.
महसूल
विभागाशी संबंधित असलेल्या अर्जदाराला वहिवाटीसाठी रस्ता देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही
करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. शासकीय नियमाप्रमाणे
प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असून त्या नुसार इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर
मिळेल असे ग्रामविकास विभागाशी संबंधीत असलेल्या अर्जदाराला तसेच नगरविकास विभागाशी
संबंधित असलेल्या अर्जदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याच्या
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री
श्री. चव्हाण यांनी संबंधित अर्जदारांना यावेळी सांगितले.
याप्रसंगी
मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, महसूल विभागाचे अपर मुख्य
सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य
प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना,
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधु, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव
श्रीकांत सिंह यांच्यासह संबंधित विभागांचे
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * * *
* * * * *
No comments:
Post a Comment