जळगांव, दि. 26 :- शासनाचे मुख्यपत्र असलेल्या लोकराज्य मासिकामधील
माहिती सर्वांसाठी मार्गदर्शक असणारी असल्याने प्रत्येकाच्या घरी लोकराज्य अंक
असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी लोककराज्य अंकाचे वार्षिक वर्गणीदार होण्याचे
आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा नाशिक मंडळाचे विभागीय सचिव
भगवान सुर्यवंशी यांनी केले ते जळगांव येथील
प. न. लुंकड हायस्कूलच्या सभागृहात आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत
बोलत होते.
यावेळी माध्यमिक
शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक
संचालक प्रकाश सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे आदि उपस्थित होते.
श्री. सुर्यवंशी
पुढे म्हणाले की, लोकराज्यचे अंक वाचनीय असून विविध विषयांवर प्रसिध्द झालेले
विशेषांक सर्व अंक संग्रही ठेवण्यासारखे आहेत. जुलै 2012 चा लोकराज्य अंक हा
शैक्षणिक विषयाला वाहिलेला विशेषांक असून यातील माहिती ही प्रत्येकाला मार्गदर्शक
ठरेल व शिक्षकांच्या ज्ञानात अधिकची भर घालणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकराज्य
अंकामधील माहिती ही विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या उमेदवाकरिता फार मौलिक
ठरत असून सर्वांनी लोकराज्य अंकाचे वाचन करणे आवश्यक असल्याचे श्री. सुर्यवंशी
यांनी सांगितले.
जळगांव
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने येथे लोकराज्य मासिकाचे वार्षिक
वर्गणीदारनोंदणीचा स्टॉल लावण्यात आला होता. सदरच्या स्टॉलला उपस्थितीत
मुख्याध्यपकांनी चांगला प्रतिसाद दिला. व लोकराज्य अंकाची विक्रीही झाली.
No comments:
Post a Comment