Thursday, 19 July 2012

जिल्हास्तरीय कापूस तक्रार निवारण समितीकडून कापूस पिकाची पहाणी

जळगांव,दि. 19 :- जिल्हा स्तरीय कापूस तक्रार निवारण समितीने मालखेडा  (ता. जामनेर), लोणे (ता. पारोळा) अंजनिविहरे (ता. धरणगांव) येथील कापूस पिकाची पाहणी दि. 17 जुलै रोजी केली. सदरच्या पाहणीत येथील कापूस पिकाची पाने पिवळी / लाल होणे, झाड कोमजणे मर रोगासारखा प्रार्दुभाव झाल्याचे आढळून आलेले आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस.मुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            सदरच्या ठिकाणी कापूस पिकांवर वातावरणातील बदल, तापमानात झालेली वाढ , हवेतील घटलेली आर्द्रता लांबलेला पाऊस यामुळे कापसांवर मर रोगासारखा प्रादुर्भाव झाल्याचा आढळून आले आहे. असा प्रार्दुभाव सदरच्या ठिकाणा सह इतर ठिकाणी आढळून आल्यास 1.5 टक्के युरिया 1.5 टक्के पोटॅश यांचे दीडशे ते दोनशे मिली द्रावण झाडाच्या खोडाभोवती आळवणी (ड्रेचिंग) करावे. त्यांनतर पिकाला पाणी दयावे त्यानंतर 15 दिवसांनी 2 टक्के डी.ए.पी.द्रावणाचे ड्रेचिंग करावे. अशा उपाय योजना शेतक-यांनी करण्याची शिफारस डॉ. संजय पाटील यांनी केली आहे.
            सदरच्या पाहणीस जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, कृषि सभापती सौ. कांताताई मराठे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस.मुळे कृषि विकास अधिकारी एन.व्ही. देशमुख डॉ. संजय पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस.टी.पाटील, जामनेर, तालुका कृषि अधिकारी जाधव, आदिसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.        
                                                                                  0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment