Thursday, 19 July 2012

10 वी 12 वी च्या परीक्षांची तारीख जाहिर

जळगांव, दि. 19 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे / नागपूर / औरंगाबाद / मुबंई / कोल्हापूर/ अमरावती / नाशिक/ लातूर / कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च 2013 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी ) परीक्षा गुरुवार दि. 21 फेब्रुवारी, 2013 ते गुरुवार दि. 21 मार्च, 2013 तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) विषयाची Online  परीक्षा दि. 22,23 25 मार्च 2013 रोजी घेण्यात येणार आहे त्या प्रमाणेच  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी ) परीक्षा - शनिवार दि. 2 मार्च, 2013 ते सोमवार       दि. 25 मार्च 2013 या कालावधीत घेतली जाईल. विद्यार्थ्यांचे मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी - मार्च 2013 मध्ये आयोजीत लेखी परीक्षेचे वेळेपत्रकात गतवर्षीप्रमाणेच प्रमुख विषयादरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजीत केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.msbshse.ac.in संकेतस्थळावर दि. 1 जुलै 2012 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
            संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. लेखी परीक्षेपुर्वी शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन खात्री करुन घ्यावी विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे, असे आवाहन शहाजी ढेकणे सचिव राज्यमंडळ, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.      
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment