जळगांव, दि. 19 :- थोर साहित्यीक कै. अण्णाभाऊ साठे यांची 43 वी पुण्यतिथी दि 18 जुलै 2012 रोजी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय जळगांव येथे साजरी करण्यात आली.
सदर पुण्यतिथी कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले विकास महामंडळ जळगांव श्री. म्हसदे , हे उपस्थित होते तसेच जळगांव येथील थोर सामाजिक कार्येकर्ते श्री नाना वैराळे (शाहु ब्रिगेड संघटना) श्री. कैलासजी चांदणे (बहुजन मिल परिषद) श्री निकम जामनेर श्री गोटु जाधव, श्री बापु पारधी, गुरचळ व महामंडळातील कर्मचारी श्री चांदणे हे उपस्थित होते.
प्रथम प्रमुख पाहुण्यांनी दिप प्रज्वलन करुन कै अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले वाहुन आदरांजली वाहिली व कै.अण्णाभाऊ साठे यांचे जीवनावर मान्यवरांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री. प्र.मु. चांदणे यांनी केले. तर गुरचळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment