Thursday, 19 July 2012

जळगांवात 29 जुलै रोजी विभागीय रोजगार मेळावा

जळगांव, दि. 19 :- राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत दि. 29 जुलै 2012 रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक संचालक प्रकाश सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            सदरच्या विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असून यावर्षी     दि. 29 जुलै 2012 रोजी सकाळी 11 वाजता सरदार लेवा हॉल, आंबेडकर मार्केट, जळगांव येथे करण्यात आले आहे. जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त गरजू उमेदवारांनी सदरच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन रोजगार स्वयंरोजगार कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment