Tuesday, 28 January 2025

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम



जळगाव, दिनांक 28 जानेवारी (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये महामंडळाच्या योजनांच्या आढाव्याकरिता व कामकाजानिमित्त उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता शासकीय वाहनाने जळगाव जिल्ह्याकडे प्रयाण, सायंकाळी ५.०० वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन. शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे बैठकीसाठी उपस्थिती, दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पत्रकार परिषद, दुपारी २.०० ते ७.०० पर्यंत राखीव वेळ. सायंकाळी ७.०० वाजता मराठा प्रिमिअर लिग (MPL),च्या उद्घाटनाकरिता प्रयाण रात्री ११.२० वाजता अमरवती एक्सप्रेसने मुंबईसाठी प्रयाण.

No comments:

Post a Comment