जळगाव, दिनांक 28 जानेवारी (जिमाका) : सन 2025 या कॅलेंडर वर्षासाठी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकींग विभाग वगळून) तीन सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी पोळा शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025, घटस्थापना सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर 2025 व नरक चतुर्दशी सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2025 याप्रमाणे एकूण तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
तरी सर्व शासकीय आस्थापनांनी याची नोद घ्यावी, असे अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment