नागपूर, दिनांक 22 जानेवारी : राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास भेट दिली. यावेळी त्यांनी प्राणीसंग्रहालयाची पाहणी केली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली कामे तसेच नियोजित कामांविषयीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट देत पाहणी केली.
यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौर, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाला, मुख्य महाव्यवस्थापक टी. ब्युला, संचालक (प्राणी संग्रहालय) शतानिक भागवत, सहाय्यक व्यवस्थापक सारिका खोत यांच्यासह वन विभागाचे स्थानिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment