जळगाव, दिनांक 22 जानेवारी (जिमाका) : सन २०२४-२५ अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटी वर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत.
या बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर या बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
यांत्रिकीकरण व सिंचनया टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी, २०२५ असेल आहे. तरी, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय कृषी मह संचानक / जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी उपसंचालक सुस्मिता तवटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment