Monday, 27 January 2025

जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन



जळगाव, दिनांक 27 जानेवारी ( जिमाका ) : जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले आहे.त्याचे उदघाटन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.
या नव्या कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, लेखाधिकारी यांचे दालन, कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्था, तसेच कार्यालयीन सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
नूतनीकरणानंतर कार्यालयाची उत्कृष्ट बैठक व्यवस्था आणि आधुनिक सुविधा पाहुन सर्व मान्यवरांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नियोजनाचे कौतुक केले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील इतर कार्यालयांचेही नूतनीकरण करून सुसज्ज करण्याची यावेळी सूचना दिली.
सध्या जिल्हा नियोजन समिती कार्यालय नूतनीकरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज झाले आहे. बैठकीसाठी स्वतंत्र दालने, कर्मचारी वर्गासाठी सुविधा, आणि कामकाज सुटसुटीत होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment