Tuesday, 28 January 2025

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध ; विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी


  जळगाव, दिनांक 28 जानेवारी (जिमाका) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. या परिक्षेच्या कालावधीत परीक्षेचा व अभ्यासाचा ताण आणि परीक्षेची भिती यामुळे विद्यार्थी दडपणाखाली येवून नकारात्मक विचार करतात व कधी-कधी टोकाची भुमिका घेतात.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व त्यांनी निकोप वातावरणात परीक्षा द्यावी म्हणून विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येत असते. विद्यार्थ्यांच्या ताण-तणाव विषयक समस्यांचे शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी व ताण-तणावामुळे विद्यार्थ्यांनी टोकाची भुमिका घेवू नये यासाठी समुपदेशनासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर खालील समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थी / पालकांना काही ताण-तणाव / समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे ताण-तणाव/समस्या मांडल्यास त्यांना समुपदेशकांमार्फत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.

नाशिक : श्री. किरण रामगीर बावा ९४२३१८४१४१
श्री. अरूण बंडू जायभावे ९६५७५०१७७३

धुळे : श्री. नंदकिशोर उध्दवराव बागुल ९४२०८५२५३१
श्री. लक्ष्मीकांत बापुराव २ पाटील ८६९८०१२७७७

जळगाव : श्री. दयानंद रघुनाथ महाजन ७७६८०८२१०५, ९३७०६१४९५९
श्री.किरण प्रकाश सनेर ९०२८९१०७८५, ९५४५०२५४५०

नंदुरबार :
श्री. राजेंद्र सुकदेव माळी ९४०४७४९८००
श्री.अशोक भटा महाले ९४२१६१८१३
ही सुविधा दिनांक ११ फेब्रुवारी 2025 ते १८ मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम.एस. देसले यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment