आधुनिक शेती औजारांचे आमदार राजीव देशमुख यांचे हस्ते वितरण
चाळीसगाव,दिनांक 7 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पणन
विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत
कोरडवाहू शेती अभियान सन 2014-15 अंतर्गत आधुनिक ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्राचे
वाटप आज आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाले.
तालुक्यातील 46 अल्प, अत्यल्प, महिला मागास शेतक-यांना या ट्रॅक्टर चलीत शेती
औजारांचा नक्की फायदा होईल असा विश्वास आमदार देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविला.
यावेळी उपसभापती लताताई दौंड, पंचायत समिती सदस्य अभय पाटील, कृषी उत्पन्न बाजार
समितीचे संचालक दिनेश पाटील, प्रविण पाटील, माजी पं.स.सदस्य संजय संतोष पाटील,
तालुका कृषी अधिकारी व्हि.एस.शिंदे आदि उपस्थित होते.
आपल्या
अध्यक्षीय भाषणात आमदार देशमुख म्हणाले की, तालुक्यात कमी व असमाधानकार पर्जन्यमानामुळे तसेच गारपीट
मुळे त्रस्त शेतक-यांना समृध्द करण्यासाठी शासन कटीबध्द् असून आधुनिक शेती
औजारांमुळे शेतक-यांचा वेळ, पैसा व श्रम वाचून शेतकरी ख-या अर्थान समृध्द होण्यास
नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले. त्याच बरोबर
नैसर्गिक आपत्ती काळात शेतक-यांचे पंचनामे करण्याचे महत्वाचे कामकाज हे
कृषी विभागामार्फत होत असते तरी कृषी विभागातील सर्व संबंधीतांनी प्रत्यक्ष पहाणी
करुनच पंचनामे सादर करावे व शेतक-यांना न्याय द्यावा अशा सुचना त्यांनी यावेळी उपस्थित
अधिकारी कर्मचा-यांना दिल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे
संचालक दिनेश पाटील यांनी यांत्रीकीकरणाची योजना ही प्रभावशाली असून तालुक्यातील
जमीनीचा स्तर व पुरवठा करण्यात येणारे यंत्र सामुग्री बाबत बोलतांना 35 एच.पी.वरील
ट्रॅक्टरसाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी आमदारांना विनंती
केली.
तालुका कृषी अधिकारी व्ही.एस.शिंदे
यांनी सदर योजनेबाबत माहिती देतांना सांगितले की, आमदार राजीव देशमुख यांच्या
प्रयत्नानेच जिल्हयाभरात सर्वाधिक 46 पेरणी यंत्र आपल्या तालुक्याला प्राप्त झाले आहेत पैकी अत्यल्प भुधारक
शेतक-यांना 91 टक्के तर मोठया शेतक-यांना 72 टक्के दराने सबसिडी मंजूर झाल्याचे
सांगितले. यामध्ये चार दाती पेरणी यंत्राची मुळ किम्मत रु. 48,348/- असून नऊ दाती
यंत्राची किम्मत 54,000/- असल्याचेही त्यांनी
सांगितले व पेरणी यंत्राबाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश
चंदिले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी
अ.जे येवले मंडळ कृषी अधिकारी तळेगांव व सर्व मंडळ कृषी अधिकारी तसेच अनिल
तायडे, व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर आभार येवले यांनी मानले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment