“ नेतृत्वाचे सर्वसमावेशक निर्णय ” पुस्तिका
उपलब्ध
जळगाव दि.
19, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाने “नेतृत्वाचे सर्व समावेशक निर्णय “ या महत्वपूर्ण माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन केले
असून सदरील पुस्तिकेत प्रत्येक घटकाशी असलेली बांधिलकी प्रत्यक्षात साकारणा-या शासनाने कृषी, उद्योग आरोग्य
, शिक्षण, ऊर्जा, जलसिंचन,
सहकार, प्रशासन इत्यादी क्षेत्रात प्रभावी वाटचाल केली आहे.
त्यासोबतच विविध वंचित,
अपेक्षित समुहांच्या जीवनात परिवर्तन
घडवून आणले आहे. सर्वसामान्य
जनतेच्या सर्वांगीण हितासाठी कटिबध्द असलेल्या राज्य शासनाने अलीकडच्या काळात
केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन या पुस्तिकेत असून सदरील पुस्तिका जळगाव जिल्हयातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा
माहिती कार्याल, जळगाव येथे जनतेसाठी मोफत उपलब्ध आहेत.
तरी जनतेने नेतृत्वाचे सर्व
समावेशक निर्णय भेट पुस्तिका प्राप्त करुन घ्यावी,
असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने आतापर्यत जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या
निर्णयांची माहिती या पुस्तिकेत असून त्यात मराठा समाजातील शैक्षणिक व सामाजिक
दुर्बलांसाठी 16 टक्के आरक्षण,
मुस्लिम समाजातील शैक्षणिक व सामाजिक
दुर्बलांसाठी 5 टक्के आरक्षण,
108 क्रमांकावर फोन केल्यास अत्याधुनिक
रुग्णवाहिका विनामुल्य सेवेसह तात्काळ हजर,
104 क्रमांकावर फोन केल्यास रक्त
पुरविण्यासाठी ब्लड ऑन कॉल योजना, गरीबांसाठी
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, राज्यातील रुग्णांना शासकीय रुग्णालयातून मोफत औषधे,
मुंबईसाठी 103 क्रमांकावर फोन केल्यास आणि राज्यातून कोठूनही
1091 क्रमांकावर फोन केल्यास अडचणीतील
महिलांना मदत उपलब्ध, अन्नसुरक्षा
योजनेची यशस्वी अंमलजावणी 8 कोटी
लोकांना फायदा, जादूटोणा
आणि अंधश्रध्दा विरोधी कायदा करणारे पहिले राज्य, कोरडवाहू शेतीसाठी अभियान, उद्योगांच्या समतोल विकासासाठी आकर्षक नवीन धोरण,
26 महानगरपालीकांमध्ये स्थानिक संस्था कर
लागू, इंदू मिलची जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मारकासाठी, मुंबईत
पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी, मेट्रो
मोनोरेल सुरु , मुंबईतील
1 जानेवारी 2000 पर्यतच्या झोपडयांना संरक्षण, सिमेंट साखळी नाला बंधा-यांचा महत्वाकाक्षी कार्यक्रम,
ग्रामीण भागात सुविधा केंद्रांमधून
विनासायास दाखल, सुकन्या
आणि मनौधैर्य योजनेतून महिलांना संरक्षण, ई-स्कॉलरशिपमुळे
लाखो विद्यार्थ्याना फायदा, मदरसा
आधुनिकीकरणासाठी विशेष निधी, महिलांवरील
अत्याचाराच्या, खटल्यांसाठी
फास्ट ट्रॅक कोर्ट्स, गिरणी
कामगारांना अतिशय स्व:स्तात
घरे उपलब्ध, शेतक-यांना कृषिपंपाच्या वीजबिलात सवलत देणारी कृषिसंजीवनी योजना
अशा अनेक महत्वपूर्ण माहिती असलेली पुस्तीका आहे.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment