लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी
नागरिकांचा सहभाग अपेक्षीत !
: अप्पर
जिल्हाधिकारी गुलाबराव खरात
चाळीसगाव, दिनांक 1 :- लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग
अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी
महसूल दिनाच्या कार्यक्रमात केले. चाळीसगांव तहसिल कार्यालयात महसुल दिनानिमीत्त
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष शहराचे
नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, जि.प.सदस्य प्रभाकर जाधव, उप विभागीय अधिकारी मनोज
घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नगर पालीका मुख्याधिकारी रविंद्र जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी
खरात म्हणाले की, शेतक-यांसाठी महसूल दिन व कृषि दिन दोन दिवस महत्वाचे असून या दिवसाचे महत्व ओळखून शासन आपल्यासाठी विविध नाविण्यपुर्ण
योजना राबवित असते त्याची माहिती व लाभ मिळविण्यासाठी मोठया प्रमाणात सहभाग
नोंदवून लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महसूल प्रशासनाने गेल्या
वर्षभरात राबविलेल्या विविध योजना जसे शिवार रस्ते, वन हक्क, सातबारा संगणकीकरण, शिधा
पत्रीकांचे नुतणीकरण, कुटूंब अर्थसहाय्य योजना, आम आदमी विमा योजना, कुळ कायदा जमिनी,
अतिसार नियंत्रण पंधरवाडा व आधारवड योजना या सारख्या लोकाभिमुख योजना प्रभाविपणे राबविल्या आहेत.
आधारवड योजनेत जिल्हाभरात
चाळीसगांव प्रशासनाने सर्वाधीक लाभार्थ्यांना लाभ देऊन प्रथम क्रमांक
मिळविला आहे. तरी या प्रकारे शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजना तळागाळापर्यंत
पोहचल्या पाहिजेत म्हणून पुढील वर्षात गावागावात जाऊन योजना राबविण्याचा कालबध्द
कार्यक्रम आखण्यात आला असून नागरिकांकडूनही यामध्ये सक्रीय सहभाग नोंदविण्याचे
आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी यावेळी केले.
यावेळी
शहराचे नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर
प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मार्गदर्शन करतांना महसूली आर्थिक वर्ष
म्हणजे जमाबंदी साल व या वर्षभरात
प्रशासनामार्फत 1 ते 31 नमुने अद्यावत करणे, निस्तार पत्रक भरणे, महसूल
गोळा करणे, शिधा पत्रीकांसाठी शिबीरांचे आयोजन करणे अशा राबविण्यात येणा-या विविध
कार्यक्रमाची माहिती विषद करुन सांगितली. प्रारंभी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी महसूल दिनाची
पार्श्वभुमी विषद करुन मार्गदर्शन केले व महसूली वर्षामध्ये शेतक-यांनी
भरावयाचा महसूल विहीत मुदतीत भरण्यासाठी आवाहन केले.
विविध प्रकारचे दाखल्यांचे
गुलाबराव खरात यांच्या हस्ते वाटप
महसूलदिनाचे औचित्य साधत आज
तहसिल कार्यालयात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनांतर्गत (आधारवड)जिल्हाभरात
चाळीसगांव तालुक्यात सर्वा धि क 3593 इतके
लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला असून प्राति नि धीक स्वरुपात 24
लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या लाभाच्या पावत्यांचे वितरण,
तसेच कुळकायदा कलम 43 च्या शर्तीच्या 1047 गट असून इतर अधि कारातील शेरा जमी करुन प्राति नि धीक स्वरुपात 12 शेतक-यांना शेरा कमी
केलेला 7/12 उता-याचे वितरण, नव्याने लागु झालेल्या मराठा आरक्षणाचे दाखल्याचे
वितरण, तर पात्र असलेले पिवळे शि धापत्रीका व केशरी शि धापत्रीकांचे वितरण हे अप्पर जि ल्हा धि
कारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते करण्यात
आले.
संजय गांधी शाखेचे नायब
तहसिलदारांचा सत्कार
आधारवड
योजनेत सर्वाधीक लाभार्थीं करण्याचा मान चाळीसगांव प्रशासनाने मिळवीला असून या
कामात सक्रीय सहभाग घेणारे नायब तहसिलदार ए.एन.परमार्थी यांचा गुलाबराव खरात
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी,
नागरिक, लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी केले तर नैसर्गीक आपत्तीमुळे पुणे जिल्हयातील
माळीण या गावातील मयत नागरिकांना श्रध्दांजली वाहून नानासाहेब आगळे यांनी आभार
व्यक्त केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment