शिक्षणासाठी नवमाध्यमांचा
वापर आवश्यक : पालकमंत्री सावकारे
भुसावळ, जि जळगाव, दि. 16 ऑगस्ट :- विद्यार्थ्यांना चटकन आकलन व्हावे,
यासाठी प्रत्येक शिक्षक आपल्या कौशल्याचा वापर करीत असतो. शिक्षण हे अधिक मनोरंजक
पध्दतीने व्हावे, यासाठी नवनविन माध्यमांचा वापर व्हावा, यासाठी शासनही आता अनेक
ठिकाणी ई-लर्निग सुरु करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय विकास, रोजगार, स्वयंरोजगार, सामाजिक न्याय व्यसनमुक्ती कार्य
राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी केले.
भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव
2014 सोहळयात ते मार्गदर्शन करत होते. या सोहळयास पंचायत समितीच्या सभापती मंगलाताई
झोपे, जि. प. सदस्य समाधान पवार, नगराध्यक्ष हाजी अख्तर पिंजारी, गटशिक्षणाधिकारी
पी. एन. ठाकरे, शिक्षण अधिकारी माध्यमिक शशिकांत हिंगोणेकर आदि मान्यवर उपस्थित
होते. यावेळी मार्गदर्शन करताना ना. सावकारे म्हणाले की, शिक्षक हा समाजात आदराचा
घटक आहे. तो आदर्शच असला पाहिजे. ज्यांना “आदर्श
शिक्षक पुरस्कार” मिळाले ते तर
आदर्श् असतातच पण ज्यांना पुरस्कार मिळत नाहीत तेही आदर्शच असले पाहिजे.
शिक्षणाव्यतिरिक्त् अन्य विषयात रस घेवून काम करणारे शिक्षक हे सा-यांसाठी
मार्गदर्शक असतात, असे सांगून त्यांनी शिक्षकांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव केला.
असे आदर्श शिक्षकच आदर्श समाज घडवितात असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी खालीलप्रमाणे
शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कारर्थी माध्यमिक शाळा
शिक्षक शिक्षकवृंद
श्री. जयंत श्रीकृष्ण
जोशी, मधुकर रामदास चौधरी, श्री. सुरेश सिताराम अहिरे, श्रीमती अपर्णा रामसिंग
राजपूत, श्री. लिलाधर दामू ब-हाटे, श्री. दिलीप एम. मराठे, श्री. बाळू नामदेव
पाटील, श्री. नारायण दत्तू माळी, डॉ. प्रकाश संपत कोळी, श्री. बक्षोमल गुरुदासराम
जग्यासी, श्री. अनिल कोष्टी, श्री. शशिकांत वसंत झामरे, श्री. जी. एम. महाजन,
श्री. अरुण रामचंद्र धनपाल, सौ. स्वाती उल्हास राणे, श्रीमती सिमा जगन्नाथ भारंबे,
श्री. एस. टी. शर्मा, सिस्टर फिल्डा मिस, श्री. मजिद खान हुसेन खान, हबीब खान हमीद
खान, श्रीमती एस. आर. लांडे श्री. अनिल राजाराम गुरचळ, श्री. केशव प्रभाकर चौधरी,
डॉ. जगदिश एन पाटील
पुरस्कारार्थी शिक्षकवृंद
श्री. राजू रुपचंद्र कापडणे, श्रीमती पल्लवी महेंद्र पाटील,श्री.
मनोज रामस्वरुप माहेश्वरी, मो. अब्दुल तब्बाब, श्री. दिपक प्रभाकर सुरवाडे, श्री.
रविंद्र पंडीत मलाणे, श्री. जगदिश रामभजन शर्मा, श्रीमती राजश्री मोहन पाठक, श्री.
शेख, रसिद शे, जब्बार, श्री. संतोष ज. तायडे, श्रीमती सोनाली प्र. बेंडाळे,
श्रीमती निशाताई. भा. पाटील, श्री रमेशसिंग नयनसिंग पाटील, श्री. समोद्यीन
नकिममुद्यीन काझी, श्री. हमीद भुसावळी,
श्रीमती शारदा म. सुरवाडे, श्री. रमाकांत डी. पाटील, श्री. अमर धोंडूराम
पाटील, श्री. दिपक प्रल्हाद पाटील, श्रीमती शुभांगी गिरासे, श्री. जनार्धन
गो. जाधव, श्रीमती माधुरी मो. पाटील,
श्री. प्रवीण बा. मोरे, श्रीमती निवेदिता पाटील, श्रीमती प्रिती दिलीप भिरुड,
श्री. जीवन पाडूरंग महाजन, श्री. गणेश जनार्धन इंगळे, श्रीमती मनिषा अनिल तायडे,
श्रीमती राजश्री सुनिल सोनार, श्री. उमेश पंढरीनाथ कोल्हे
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक पाटील यांनी
केले.
* * * * * * *
No comments:
Post a Comment