Friday, 22 August 2014

बळीराजा सुखी तर जनता सुखी ! उपमुख्यमंत्री


बळीराजा सुखी तर जनता सुखी !
बळीराज्याचे पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहणार : उपमुख्यमंत्री

            चाळीसगाव,दिनांक 22 :- भारत देश हा कृषी प्रधान देश असून बळीराज्याच्या जिवावर जनता पोट भरत असते बळीराजा सुखी राहीला तर जनता सुखी राहू शकते. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून येत्या 31 ऑगस्ट नंतर नव्याने दुष्काळी ‍ परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आज चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे  बॅरेजच्या पायाभरणी कार्यक्रमात केले.
            आज तालुक्यातील गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ना.पवार पुढे म्हणाले की, अनेक वर्षापासून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण व वनमंत्रालयाची तांत्रीक मान्यते अभावी प्रलंबीत प्रकल्प आपल्या तालुक्याचे आमदार राजीव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे आज मार्गी लागला आहे. या धरण पाया व बुडीत क्षेत्रासाठी एकुण 787 हेक्टर जमीन संपादीत होणार असून यामध्ये सर्वाधीक जमीन ही सरकारी जमीन 402.49 हेक्टर, वनजमीन  94.95 हेक्टर तर खाजगी जमीन 289.56 हेक्टर इतकी संपादीत होणार असून या प्रकल्पाची साठवण क्षमता ही 39.63 द.ल.घ.मी. तर 1.40 टी.एम.सी. इतकी असणार आहे. या प्रकल्पामुळे चाळीसगांव व भडगांव तालुक्यातील 31 गावांतील 7542 हेक्टर क्षेत्रास प्रवाही सिंचनाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पातील बॅक वॉटर क्षेत्र 21 कि.मी. असून यामुळे परिसरातील भुजल पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. सन 2011-2012 च्या दरसुचीनुसार या प्रकल्पाचा खर्च हा रु. 461.67 कोटी इतका असून हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आमदार राजीव देशमुख यांनी प्रकल्पाची माहिती उपस्थित पंचक्रोशीतील शेतक-यांना ‍ देऊन केवळ शहरातील विकास कामांवर लक्ष केंद्रीत न करता शहरासोबत ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, दुष्काळाला तोंड देण्यासाठीच असे प्रकल्प मार्गी लावणार असून या सोबत मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी व त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करुन देण्यासाठी  उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना विनंती केली.
            या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, केदारसिंग पाटील, उदेसिंग पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष ॲड.रविंद्र भैया पाटील, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पं.स.सभापती विजय जाधव, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आर.एल.पाटील, प्रदीप देशमुख, शशीकांत साळुंखे, रामचंद्र जाधव, छाया महाले, अस्मिता पाटील, मधुकर चौधरी, अशोक खलाणे, पोलीस अधिक्षक डॉ.जे.डी.सुपेकर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधीकारी रविंद्र जाधव, गट विकास अधिकारी मालती जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, सदस्य, सरपंच व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                 * * * * * * * *

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते
शहरात विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

चाळीसगाव,दिनांक 22 :- राज्याचे उपमुख्यमंत्री ना.‍ अजित पवार यांच्या हस्ते आज शहरातील नागद रोड येथील स.नं. 33 मध्ये  आठवडे बाजारातील विविध विकास कामांचे भुमीपूजन करण्यात आले.
त्यानंतर पाटणादेवी रोड येथील हरीगीर बाबा नगर मधील 744 घरकुल व कै.सुवर्णाताई देशमुख नगर येथे 648 घरकुल योजना मंजूर झाली असून या साठी केंद्रशासनाकडून रु.1180.20 लक्ष तर राज्य शासनाकडून 220.39 लक्ष निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. या घरकुलांचे भुमिपूजनही ना.पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
त्यांनतर शहरातील हिरापूर रोडवरील 81.30 लक्ष खर्चाच्या महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेल्या वास्तुचे उदघाटन ना. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तदनंतर शहरातील वैशिष्टयपुर्ण योजनेतंर्गत रु. 1.18 कोटी खर्चाच्या भडगांव रोड वरील सुवर्णा स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला.
तदनंतर महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत 75 कोटी रुपये खर्चाची चाळीसगांव पाणी  पुरवठा योजनेच्या जलपुजनाचा कार्यक्रमही आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
            शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, केदारसिंग पाटील, उदेसिंग पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष ॲड.रविंद्र भैया पाटील, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पं.स.सभापती विजय जाधव, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आर.एल.पाटील, प्रदीप देशमुख, शशीकांत साळुंखे, रामचंद्र जाधव, छाया महाले, अस्मिता पाटील, मधुकर चौधरी, अशोक खलाणे, पोलीस अधिक्षक डॉ.जे.डी.सुपेकर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधीकारी रविंद्र जाधव, गट विकास अधिकारी मालती जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, सदस्य, सरपंच व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


                                                   * * * * * * * *

No comments:

Post a Comment