स्वांतत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात साजरा
चाळीसगाव,दिनांक
15 :- स्वातंत्र्यदिनाचा
67 वा वर्धापनदिनाचा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला . येथील पोलीस परेड
मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण आज प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या
हस्ते करण्यात आला प्रसंगी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी,
उपनगराध्यक्ष सिताराम अजबे, उदेसिंगआण्णा पवार, प्रदिप दादा देशमुख, तहसिलदार
बाबासाहेब गाढवे, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव
पातोंड, पोलीस निरिक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, टाकळी
प्र.चा. चे सरपंच किसनराव जोर्वेकर, नगर सेवक, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक,
पत्रकार, विद्यार्थी व विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने
उपस्थित होते.
आज
सकाळी 09:05 वाजता प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी ध्वजारोहण केल्यानंतर
पोलीस प्रशासन व होमगार्ड यांच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. तद्नंतर भारतीय
जनगणना 2011 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल नगर परिषदेचे आसाराम आवारे, प्रा.शिक्षक
शरद मोरे यांना रजत पदक तर प्रा.शिक्षीका श्रीमती कल्पना चिंचोले यांना कास्य पदक
व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर प्रांताधिकारी मनोज
घोडे पाटील यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे यांनी योगदान दिले तर आभार प्रदर्शन नायब
तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी केले.
No comments:
Post a Comment