सद्भावना दिनानिमित्त कर्मचारी अधिका-यांनी घेतली शपथ
जळगाव, दि. 20 :- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज
सद्भावना दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचा-यांना
यानिमित्त सद्भावनेची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता
आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री. खरात यांनी सर्व
अधिकारी-कर्मचा-यांना सद्भावना शपथ दिली. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय
निकम, उपजिल्हाधिकारी साजिद पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे तसेच जिल्हा
प्रशासनातील व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
* * * * * * *
डाक अदालत
23 सप्टेंबर रोजी
जळगाव,
दिनांक 20 :- पोस्टाच्या टपाल, स्पीड- पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत
बॅक, मनीऑर्डर आदि कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर
जळगाव येथे दिनांक 23 सप्टेंबर 2014 रोजी सकाळी 11.00 वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे सहा
आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची
दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपली तक्रार दोन प्रतीत एम.एस. जगदाळे , सहाय्यक अधिक्षक (मुख्यालय)
अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव 425001” यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह
दिनांक 13 सप्टेंबर 2014 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी .
तदनंतर आलेल्या तक्रारीवर कारवाई केले जाईल, परंतु त्यांचा अदालत अंतर्गत विचार
केला जाणार नाही, असे आवाहन अधिक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment