जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्पर्धांचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे.
तथापि ब-याच एकविध खेळ संघटनांद्वारा संबंधित स्पर्धाचे रेकॉर्ड फक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर केले जात असल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या संबंधित खेळातील खेळाडूंचे क्रीडा गुण मिळण्यासाठीचे प्रस्ताव पडताळणी करून पात्र खेळाडूंना क्रीड़ा गुणांची शिफारस करणे शक्य होत नाही. त्यामुळे ब-याच वेळा क्रीडा गुण सवलतीस पात्र असूनही अनेक खेळाडू विद्यार्थी कीडा गुण सवलतीपासून वंचित राहतात.
जळगाव जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या खेळांच्या स्पर्धेचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास उपलब्ध करून न दिल्याने पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यास्तव जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या खेळांच्या स्पर्धेचे रेकॉर्ड लवकरात लवकर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास हस्तेपोच अथवा कार्यालयाच्या dsojal7080 @gmail.com या ई मेल आयडीवर सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे
No comments:
Post a Comment