धावपट्टी विस्ताराच्या कामांमुळे जळगाव जिल्ह्यातील विमानसेवा अधिक सक्षम होणार असून, औद्योगिक विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
पुढील काही महिन्यांत या कामांची गती वाढवली जाणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा फळास, शेतकऱ्यांचे आभार
सध्या जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुणे या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. या विस्तारीकरणामुळे विमानसेवा अधिक सक्षम होणार असून शेतीमालाच्या कार्गो वाहतुकीस गती मिळणार असल्याने व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. नशिराबाद व चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ विमानतळाच्या विस्तारासाठी नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयींसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. आता मंजूर निधीच्या अनुषंगाने विस्तारीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment