Tuesday, 4 February 2025

जळगावने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत सकारात्मक कामगिरी; कामाचा पूर्णता दर 97 टक्के


जळगाव, दिनांक 03 ( जिमाका )- जळगावने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) भागात सकारात्मक कामगिरी केली असली तरी अजूनही काही बाबतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी हे निदर्शनास आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
पुनर्विकास प्रकल्पात 81 मंजूर प्रकल्पांसह, जळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र नागपूर (136 प्रकल्प) आणि पुणे (113 प्रकल्प) यांच्यापेक्षा ही संख्या खुप कमी आहे. मंजूर घरकुलांमध्ये 8,662 घरकुलांसह, जळगाव 15 व्या क्रमांकावर आहे. यात कामाचा पूर्णता दर 97 टक्के आहे. हा पूर्णता दर चांगला असला तरी मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर तुलनेत 3 टक्यांनी कमी आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत अद्याप 295 घरे (3%) सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिओ-टॅग केलेली पण सुरू न झालेल्या घरांची संख्या जळगावमध्ये 707 इतकी आहे.
जळगावने 97 टक्के पूर्णता दरासह चांगली प्रगती केली आहे, आजच्या सादरीकरणानुसार २९५ लाभार्थी यांनी अद्याप बांधकाम सुरू केले नसल्याचे दिसत असले तरी.ही स्थिती एक महिन्यापूर्वी ची आहे. प्रशांसनाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आजच्या स्थितीत सर्व लाभार्थी यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment