Tuesday, 18 February 2025

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


जळगाव, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. 

             सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन परिपत्रकान्वये निवासी मदरसाकडुन दिनांक  15 फेब्रुवारी 2025 से 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. यापूर्वी शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव रद्द करण्यात येत आहेत व सुधारीत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 

            शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा व इच्छुक शाळांकडून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. याची देखील संस्थांनी नोंद घ्यावयाची आहे.

No comments:

Post a Comment