Monday, 3 February 2025

माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे धान्य साठा पुरण्यासाठी दर पत्रक सादर करण्याचे आवाहन


जळगाव, दिनांक 03 फेब्रुवारी ( जिमाका ) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे ५० मुले राहत आहेत. त्यासाठी धान्य साठा हा ऑडर प्रमाने महिन्याच्या ०१ तारखेला उपलब्ध करून द्यावा लागतो. याकरिता आता GST बिलीग दुकानदारांकडून रेट कोटेशन मागविण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव धान्यसाठ्याचे बिल हे चेकव्दारे देण्यात येईल. धान्यसाठा पुरवठा करण्याची कालावधी हा ०१ फेब्रुवारी २०२५ ते ३० जुन २०२५ पर्यंत असणार आहे. तरी जे इच्छुक GST बिलीग दुकानदार (होलसेलर) असतील त्यांनी आपले रेट कोटेशन (Rafe Qoutation) घेवुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संपर्क साधण्याचे किंवा अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४. या दुरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment