लोकसभा
निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी सी-व्हिजिल अँप; नागरिकांनो,
आचार
संहितेचं उल्लंघन झाले असेल तर तात्काळ कळवा
जळगाव
जिल्ह्यात सी-व्हिजिल अँप वर 66 तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण
अमळनेर तालुक्यात एक तक्रार प्राप्त
झाली. त्या तक्रारीची सत्यता पडताळून ती वगळण्यात आली. भुसावळ तालुक्यातुन तेरा
तक्रारी आल्या होत्या त्या तेरा तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली व एकही तक्रार
प्रलंबित नाही. चाळीसगाव तालुक्यातून आठ तक्रार
प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी सत्यता पडताळून चार वगळण्यात आल्या चार
तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. चोपडा तालुक्यात चार
तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी दोन तक्रारीची सत्यता पडताळून वगळण्यात
आल्या तर दोन तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. एरंडोल तालुक्यातून एकही तक्रार प्राप्त नाही.
जळगाव शहर येथे एकोणीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी अठरा तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे तर एक तक्रार सत्यता पडताळून वगळण्यात आली. जळगाव ग्रामीण येथे चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची सत्यता पडताळून एक वगळण्यात आली तर तीन तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. जामनेर येथे सात तक्रार प्राप्त झाल्या होत्या. सातही तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. मुक्ताईनगर येथे एकही तक्रार प्राप्त झाली नाही. पाचोरा येथे पाच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची सत्यता पडताळून दोन तक्रारी वगळण्यात आल्या तर तीन तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. रावेर येथे एक तक्रार प्राप्त झाली. त्याची सत्यता पडताळून ती वगळण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात एकूण 66 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी सत्यता पडताळून 12 तक्रारी वगळण्यात आल्या तर 54 तक्रारीवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील अँपवर अपलोड करावा असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment