Wednesday, 10 April 2024

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची
                              'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

मुंबईदिनांक १० : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्जयाविषयी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसर्व टप्प्यातील निवडणुकांसाठी झालेली तयारीनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्था कार्यवाहीमाध्यमप्रमाणीकरण समितीचे कामकाजसर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. एस. चोक्कलिंगम यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत गुरुवार दि. ११ व शुक्रवार दि. १२  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

0 0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment